शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

काेराेनाच्या संकटातून सावरताना जिल्हाभरात वाढतेय तापाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 5:00 AM

पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी, खाेकला, डाेकेदुखी, अंगीदुखी हे सामान्य आजार निर्माण हाेतात. दवाखान्यात जाऊन उपचार केल्यानंतर हे आजार सहज बरे हाेत हाेते. आता मात्र उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यास काेराेनाची चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे काही नागरिक दवाखान्यात जाऊन उपचार करण्यासाठी तयार नाहीत, तर काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करीत आहेत. 

ठळक मुद्देलहान मुलांना ताप आल्यास काळजी घ्या; वेळीच करून घ्या काेराेनाचीही चाचणी

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाचे संकट कायम असताना पावसाळ्यापासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. तापावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेल्यास काेराेना चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये कायम असल्याने अजूनही काही नागरिक अंगावरच ताप धरून राहत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डासांची पैदास वाढते. नदी, विहिरीचे पाणी गढूळ हाेते, तसेच वातावरणात बदल हाेते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी, खाेकला, डाेकेदुखी, अंगीदुखी हे सामान्य आजार निर्माण हाेतात. दवाखान्यात जाऊन उपचार केल्यानंतर हे आजार सहज बरे हाेत हाेते. आता मात्र उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यास काेराेनाची चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे काही नागरिक दवाखान्यात जाऊन उपचार करण्यासाठी तयार नाहीत, तर काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करीत आहेत. 

ताप आला म्हणजे काेराेना आहे असे नाहीएखाद्या व्यक्तीला ताप आला म्हणजे, काेराेना आहे असे हाेत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीची सर्वप्रथम काेराेना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. याचे पालन खासगी दवाखान्यांनीसुद्धा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे सर्वच ठिकाणी कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा काेराेनाची तिसरी लाट आल्यास त्याचा फैलाव वेगाने हाेईल.

सारख्याच   लक्षणांमुळे संभ्रमकाेराेनाची लागण झाल्यास ताप येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, खाेकला, आदी लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यामध्ये अनेकांना ताप आल्यानंतर अंगदुखी, डाेकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याला काेराेना समजायचा की सामान्य ताप आहे हे सहजासहजी लक्षात येत नाही. 

बालकांसाठी २० टक्के खाटा राखीवकाेराेनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरू शकते, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आराेग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून २० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. 

 

टॅग्स :Healthआरोग्य