१० कोटींचा महसूल

By Admin | Updated: January 10, 2015 22:53 IST2015-01-10T22:53:22+5:302015-01-10T22:53:22+5:30

खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील ७८ रेतीघाट योग्य दाखविण्यात आले होते.

Revenue of 10 crores | १० कोटींचा महसूल

१० कोटींचा महसूल

५७ रेतीघाटांचा लिलाव : ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रिया
गडचिरोली : खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील ७८ रेतीघाट योग्य दाखविण्यात आले होते. ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रिया राबवून रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ७८ पैकी ५७ रेतीघाटाची विक्री झाली असून यातून शासनाला ९ कोटी ९७ लाख १० हजार रूपयाचा महसूल मिळाला आहे.
९ जानेवारी रोजी लिलाव झालेल्या रेतीघाटांमध्ये चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, गणपूर (रै.), इल्लूर, तळोधी (मो), दोडकुली, मोहुर्ली (मो.), कुरूड आदी १० रेतीघाटांचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा, कठाणी नदीघाट, गोगाव, खरपुंडी, बामणी, आंबेशिवणी, कनेरी, पारडी, कुपी, साखरा, राखी, शिवणी, मारदा, पुलकल, विहिरगाव, रानमूल, कुंभी (मो.), चांदाळा आदी १७ रेतीघाटांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंडाळा, आमगाव, सावंगी, विर्शी, तुकूम, कोंढाळा एक, कोंढाळा दोन आदी सहा तर आरमोरी तालुक्यातील वैरागड एक, वैरागड दोन, देऊळगाव, अरसोडा, वधाळा, किटाळी, डोंगरगाव (भु.), शिवणी (बु.) आदी आठ रेतीघाटांचा लिलाव झाला. कुरखेडा तालुक्यातील मोहगाव, गेवर्धा, कुरखेडा एक, कुरखेडा दोन, सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुड्डा, मद्दिकुंठा, नगरम, रेगुंठा माल, मेडाराम माल, रामानूर गणपती, पोचमपल्ली आदी सात रेतीघाटाचा लिलाव झाला.
ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रियेतून लिलाव झालेल्या रेतीघाटाला जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदारांकडून नियमानुसार ५७ रेतीघाटांतून रेतीचा उपसा करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Revenue of 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.