शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन जिल्हाभर उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

भेंडाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे ...

भेंडाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश येगलोपवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. ग्रामपंचायतमध्ये पाेलीस पाटील श्रीरंग मशाखेत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी सरपंच वनिता पोरेड्डीवार, नंदा मोगरे, कंदा जुवारे, अलका डांगे, अलका सातपुते, गुरूदेव डांगे, विठ्ठल सातपुते, निखिल उंदीरवाडे, वर्षा सातपुते, कुसुम उंदीरवाडे, गीता तुंबडे, संजय चलाख, ज्योती नंदेश्वर, किरण मशाखेत्री, विश्वेश्वर सहारे, पूजा खांडेकर, हर्षा सातपुते, ज्योत्स्ना वैरागडे, चरणदास कोटांगले, तलाठी डी. एस. शेडमाके, मुख्याध्यापक नीलेश खोब्रागडे उपस्थित हाेते. ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वंदना गुरनुले, पाैर्णिमा साव यांनी सहकार्य केले.

कौसल्या निवासी मतिमंद विद्यालय बोदली (गडचिरोली) : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक प्रशांत जोशी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. संचालन प्रमोद चिल्वरवार यांनी केले. याप्रसंगी मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, अधीक्षक अरविंद सजनपवार, विशेष शिक्षक अरविंद टाकसाळे, तनुजा मोहिते, उमेश देशमुख, राजू सुरसे, राजू भोमले, वीणा बोधनकर, अंजना शिंदे, किरण निकोडे, मंगेश मस्के यांच्यासह रवींद्र जयपूरकर, राजेंद्र सूर्यवंशी, अशोक खेडकर, सतीश मरघड, दिवाकर पिपरे, छाया अलामे उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय धानोरा : येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर तंबाखूमुक्ती व स्त्री भ्रूणहत्याविराेधी शपथ घेण्यात आली.

आदर्श महाविद्यालय देसाईगंज : प्रजासत्ताक दिनानिमित्त नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्य साधना सपाटे यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करुन तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष के. जे. घोरमोडे, सचिव मोतिलाल कुकरेजा, उपाध्यक्ष जगदीश शर्मा व नागरिक उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज : प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयंतराव हटवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव नत्थूजी पापडकर, सहसचिव अंजली हटवार, सदस्य ह.बा. रहाटे, एल. बी. पिलारे, मुख्याध्यापक जे. एन. बुद्धे, उपमुख्याध्यापक डी.जी. भुपाल उपस्थित हाेते.

महात्मा जाेतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राचार्य प्रल्हाद मंडल व प्राचार्य संजय फुलझेले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष ताराचंद घ्यार, पर्यवेक्षक श्रीधर चौधरी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शारीरिक शिक्षक सुशील अवसरमोल यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.