शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:48 IST

देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले.

ठळक मुद्देवाघाला पकडणार : कोढाळा जंगलात केले होते जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईग्ांज : देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले. वनविभागााने पकडलेली वाघीण नरभक्षक आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी तज्ज्ञाची समिती ठरविण्यात आली होती. या समितीने जेरबंद केलेली वाघीण नरभक्षक नसल्याचे समितीने ठरविले आहे. यामुळे परिसरात मानवाची शिकार केलेल्या वाघाला पकडण्यासाठी पुन्हा वनविभागाला प्रयत्न करावे लागणार आहेत.देसाईग्ांज तालुक्यातील कोंढाळा व आरमोरी तालुक्यातील रवी व आरसोडा या भागात नरभक्षक वाघाने दोन नागरिक व पाळीव जनावरांची शिकार केल्यामुळे संपूर्ण परीसर वाघाच्या दहशतीत होते. वाघ पकडण्यासाठी वनविभागाने सर्वप्रकारचे प्रयत्न चालविले होते. वन विभागाच्या सततच्या प्रयत्नाअंती १२ आॅगस्ट रोजी वाघाला पकडण्यात यश प्राप्त झाले. मात्र पकडलेला वाघ नसुन वाघीन असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात नर व मादा वाघ असल्याचे वनविभागाने आधिच स्पष्ट केले होते. पकडलेल्या वाघीणीला वनविभागाने नागपूर येथील गोरेवाडा पाठविण्यात आले. वाघीनीची देखरेख करण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये नागपूर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहा प्रमुख डॉ.एन.एन. झाडे, उपविभागीय वनअधिकारी एस.बी. फुले, उत्तम सावंत, जी. के वशिष्ठ, नंदकिशोर काळे, सामपुडा फाउंडेशनचे प्रमुख किशोर रिठे, डॉ. विनोद धुत, डॉ.ए. डी. कलकुटे आणि जिल्हा वन्यजीव अधीक्षक कुंदन हाटे समितीत होते. स्थापन केलेल्या समितीने वाघीनी बाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. अहवालात जेरबंद केलेली वाघीण उत्तम अवस्थेत असून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जावे तसेच ती नरभक्षक नसल्याचे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. देसाईग्ांज व आरमोरी तालुक्यात वाघाने लवाजी मेश्राम व वामन मराप्पा यांना वाघाने ठार केले. त्यामुळे शिकार केलेल्या ईसमांना वाघाने मारले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघीणीला पकडण्यासाठी वनविभागाला दोन महिन्याचा कालावधी लागला होता. आता पुन्हा वाघाला पकडण्यासाठी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नरभक्षक वाघ रवी गावाच्या जंगलात कायम असल्याने या वाघाकडून नागरिकांवर आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.