शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रिक्त पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM

रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत एकूण २१० पदांसाठी विशेष कंत्राटी पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवीन ७६ डॉक्टर मिळणार : आरोग्य विभागातील २१० पदे तातडीने भरणार

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष कंत्राटी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीतून जिल्ह्याला तज्ज्ञांसह एकूण ७६ नवीन डॉक्टर मिळणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी दोन शासकीय रुग्णालये आहेत. तालुकास्तरावर तीन उपजिल्हा रुग्णालय व नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आरोग्य व ३०० पेक्षा अधिक उपकेंद्र आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागातील व दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत एकूण २१० पदांसाठी विशेष कंत्राटी पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.विशेष कंत्राटी पदभरतीदरम्यान भरावयाची सर्वच २१० पदे ही कंत्राटी/करार तत्त्वावरील असून राज्य शासनाची अथवा राष्टÑीय आरोग्य अभियानाची नाहीत. सदर भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना ३१ मे २०२० पर्यंत किंवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी येईल, तोपर्यंतच्या कालावधीसाठीच नियुक्ती दिली जाणार आहे. त्यानंतर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. भरण्यात येत असलेली २१० पदे ही मानधन तत्त्वावर असून एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.या पदांचा समावेशसुपर स्पेशालिस्ट २ पदे (कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट), भूलतज्ज्ञ ७ पदे, स्त्रीरोग तज्ज्ञ ५ पदे, बालरोग तज्ज्ञ ७ पदे अशी पदे भरण्यात येणार आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ९ पदे, वैद्यकीय अधिकारी गट ब (बीएएमएस) ४५ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २० पदे, औषध निर्माण अधिकारी २३ पदे व स्टाफ नर्स व एचएचव्हीची मिळून ९२ पदे भरण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्यकोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्हा सीमा बंद करण्यात आली असून एसटी व खासगी वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन नसल्याने शक्यतोवर जिल्ह्यातील उमेदवारांनीच अर्ज सादर करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. सदर पदभरतीसाठी मुलाखत होणार नसल्याने उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेलद्वारेच करावे. कुणीही प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊ नये, असे समितीने म्हटले आहे. सदर भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdocterडॉक्टर