शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४२ प्रस्तावाला पोलीस विभागाकडून शिफारस

By admin | Updated: September 6, 2016 00:52 IST

राज्याच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत सन २०१५ पासून...

नक्षल गावबंदी योजना : ५०३ प्रस्ताव थंडबस्त्यातगडचिरोली : राज्याच्या गृह व आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या नक्षल गावबंदी योजनेंतर्गत सन २०१५ पासून ३० आॅगस्ट २०१६ पर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने आदिवासी ३९२ व गैरआदिवासी १५३ अशा एकूण ५४५ गावांचे प्रस्ताव सादर केले. यापैकी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने नक्षल गावबंदी योजनेच्या केवळ ४२ प्रस्तावांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उर्वरित ५०३ गावांचे प्रस्ताव थंडबस्त्यात आहेत.जिल्हा पोलीस विभागाने नक्षल गावबंदी योजनेंतर्गत ४२ गावांच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ३४ आदिवासी व आठ गैरआदिवासी गावांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. नक्षल गावबंदी योजनेंतर्गत गावांनी ग्रामपंचायत व ग्रामसभेचा ठराव पारित करून नक्षलवाद्यांना गावबंदी केली. अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने सदर ठराव जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडे संबंधित गावांनी सादर केले. मात्र शासन व प्रशासकीय दिरंगाईमुळे तब्बल ५०३ गावे शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. आदिवासी विकास विभागाने सन २००३ पासून आदिवासी गावांसाठी तर गृह विभागाने नक्षलग्रस्त आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील गैरआदिवासी गावांसाठी सन २०१०-११ या वर्षापासून नक्षल गावबंदी योजना सुरू केली. नक्षल गावबंदी योजनेंतर्गत नक्षल गावबंदी केलेल्या संबंधित गावांना विकासात्मक कामासाठी तीन लाख रूपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान शासनाकडून दिले जाते. सदर प्रोत्साहनात्मक निधी संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत वितरित करण्याची तरतूदही या योजनेच्या शासन निर्णयात नमूद आहे. सदर प्रोत्साहनात्मक निधी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवून संबंधित यंत्रणेला वितरित करण्यात येतो. मात्र गेल्या वर्षभरापासून या योजनेचा प्रोत्साहनात्मक निधी संबंधित गावांना न मिळाल्याने त्या गावातील विकासकामांना खिळ बसली आहे.