धानोरा येथे रमाई जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:31+5:302021-02-11T04:38:31+5:30

धानोरा : प्रकाश बुद्ध महिला मंडळाच्या वतीने धानाेरा येथे बुद्ध विहाराच्या पटांगणात माता रमाई यांची जयंती साजरी ...

Ramai Jayanti celebrations at Dhanora | धानोरा येथे रमाई जयंती साजरी

धानोरा येथे रमाई जयंती साजरी

धानोरा : प्रकाश बुद्ध महिला मंडळाच्या वतीने धानाेरा येथे बुद्ध विहाराच्या पटांगणात माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका वंदना उंदीरवाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माळी महिला समाज मंडळाच्या अध्यक्ष किरण सोनुले, अरुणा सोनुले, छाया भेंडारे, कल्पना येरमे, काैशल्या मडावी, रसिका मारगाये, ऋषीजी मशाखेत्री, शिवकुमार भैसारे, खुशाल ढवळे उपस्थित होते. यावेळी वक्तृत्व, रांगोळी, भीमगीत गायन, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकला जनबंधू, संचालन पियू वाघमारे तर आभार कपिलदेव मशाखेत्री यांनी मानले. यशस्वितेसाठी भूमिका सालोटकर, वंदना पिलेवान, कविता नंदेश्वर, शर्मिला मशाखेत्री, वैशाली मशाखेत्री, रत्नमाला सोरते, गीता मशाखेत्री, शेवंता मशाखेत्री, संध्या मशाखेत्री, रजनी मशाखेत्री, भाविका सालोटकर, रेखा मशाखेत्री, वेणू मशाखेत्री, प्रीती मशाखेत्री, वनमाला मशाखेत्री, शीला भैसारे, लता मशाखेत्री, जयवंता उंदीरवाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Ramai Jayanti celebrations at Dhanora