शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

रबीची १० टक्के पेरणी

By admin | Updated: November 15, 2015 00:53 IST

यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी...

अल्प पावसाचा फटका : जिल्ह्यात ७७ हजार २१५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन
गडचिरोली : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन रोवणीअभावी पडिक ठेवली. पुरेशा पावसाअभावी यंदा जड धान पिकाचा उतारा कमी येणार आहे. आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांची रबी हंगामाकडून आशा वाढली आहे. मात्र रबी हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांची सरासरी १०.२ टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदा २०१५-१६ च्या रबी हंगामात एकूण ७७ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, चना, मोहरी, तीळ, सूर्यफूल, करडई, ऊस, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाच्या पेरणीला वेग नसल्याचे दिसून येत आहे. अल्प पावसामुळे नदी नाले, कोरडे पडले असून सिंचन विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे पावसाचे पाणी खुल्या बंधाऱ्यातून निघून गेले. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकरी रबी पिकाची पेरणी करण्यासाठी प्रतीक्षाच करीत आहेत. पेरणी झालेल्या हरभरा, तूर, वाल, ज्वारी, मका आदी रबी पिकांवर विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. वातावरणातही बदलाव होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)