शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या संख्येवर घाला

By admin | Updated: July 29, 2014 23:48 IST

जिल्हा नियोजन समितीच्या ३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ना. पाटील यांना जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय

जिल्हाधिकारी कार्यालयाने चुकीची माहिती पाठविल्याचा संघटनांचा आरोपगडचिरोली : जिल्हा नियोजन समितीच्या ३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ना. पाटील यांना जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय लोकसंख्येबाबत माहिती पुरविली. या माहितीत जिल्ह्यात केवळ १ लाख २५ हजार ५२१ ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या असल्याचे म्हटले आहे. मात्र जिल्ह्यात इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्या ४० ते ४२ टक्के म्हणजे जवळपास चार लाखाच्या आसपास असल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनाकडे चुकीची माहिती पुरविली, असा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे.जिल्ह्यात ओेबीसी प्रवर्गाची लोकसंख्या बहुसंख्येने आहे. मात्र पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या १ लाख २५ हजार ५२१ असल्याची माहिती प्रशासनाने त्यांना दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमंत्री आर. आर. पाटील यांना ४ जुलै रोजी एका पत्राद्वारे सदर माहिती पाठविली. या पत्रानुसार २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. त्यापैकी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या ४ लाख ३२ हजार २४४ आहे. इतर मागासवर्गाची लोकसंख्या १ लाख २५ हजार ५२१ असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मराठा कुटुंबाची संख्या १७ हजार १७८ असल्याचे मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणानंतर दिसून आले आहे. जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्याहून ६ टक्क्यावर आणल्याने ओबीसी संघर्ष कृती समिती व इतर ओबीसी संघटनांनी वारंवार आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत शासनाला धडा शिकविण्याचा इशाराही दिला आहे. त्यानुसार ओबीसी संघटनांना आक्रमक होऊन आंदोलन करीत आहेत. २३ जुलै रोजी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र जिल्ह्यात ओबीसींची संख्या केवळ १ लाख २५ हजार ५२१ असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविल्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ओबीसींच्या लोकसंख्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे चुकीची माहिती पाठविल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे सदर कृत्य घडले आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या ४२ टक्के असून प्रशासनाने ही लोकसंख्या १ लाख २५ हजार ५२१ असल्याची माहिती कोणत्या आधारावर काढली, असा प्रश्नही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे. या संदर्भात ओबीसींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची लोकसंख्या ४० ते ४२ टक्के असल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने ओबीसींची लोकसंख्या केवळ ११.६९ टक्के पालकमंत्र्यांना दाखविली. सदर माहितीबाबत शिष्टमंडळाने विचारले असता, सदर माहितीची पुनर्तपासणी घेतली जाईल व चुकीची गेली असलेली माहिती रद्द करून नव्याने माहिती पाठविली जाईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. ओबीसींच्या शिष्टमंडळाने ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, प्रा. शेषराव येलेकर, पांडुरंग घोटेकर, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, श्रीकृष्ण कावणपुरे, विलास भांडेकर, सुधाकर पेटकर, डेडू राऊत, प्रदीप कावळे यांचा समावेश होता.