शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातील तेंदू व्यापाऱ्यांच्या वर्चस्वाला धक्का

By admin | Updated: March 19, 2015 01:30 IST

७८ टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात उच्च दर्जाच्या तेंदूपत्त्याचे उत्पादन होते.

गडचिरोली : ७८ टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात उच्च दर्जाच्या तेंदूपत्त्याचे उत्पादन होते. त्यामुळे या जिल्ह्यातील बिडी व्यावसायिकांची तेंदूपत्ता खरेदीसाठी नेहमीच पसंती राहिली आहे. मात्र २०११ मध्ये गावांना वनउपज संकलन व खरेदी-विक्रीचे अधिकार देण्यात आल्याने तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या रसद पुरवठ्यावरही टाच आणल्यामुळे तेंदूपत्ता व्यवसायातून बिडी व्यावसायिक आता हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा हे पाच वन विभाग आहेत. या वन विभागात २०१४ मध्ये १२८ तेंदू युनिट होते. गडचिरोली विभागात ३९, वडसा १९, आलापल्ली ३०, भामरागड २५, सिरोंचा १५ असे एकूण १२८ युनिट जिल्ह्यात आहेत. या युनिटमधून दोन लाख ९९ हजार ३२५ तेंदू बॅगचे संकलन केले जाते. पूर्वी या सर्व युनिटचा लिलाव वन विभागाच्यामार्फत खासगी तेंदू कंत्राटदारांना केला जात होता. यात दक्षिण भारतातील तसेच राज्यातील बिडी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर युनिट खरेदी करीत होते व गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता घेत होते. परंतु वनहक्क कायदा लागू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात २०११ नंतर गावांना वनउपज संकलन व विक्रीचे अधिकार प्रदान करण्यात आले. ग्राम पंचायतमार्फत ग्रामसभेलाही तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार प्रदान करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात गतवर्षी पेसा कायदा लागू झाला. या कायद्यामुळे अनुसूचित जमाती क्षेत्रातील ग्रामसभा आता तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहे. जवळजवळ ९२ ग्राम पंचायतींनी या कामात पुढाकार दर्शविला आहे. त्यामुळे तेंदूपत्ता व्यवसायावर असलेले बिडी व्यापाऱ्यांचे वर्चस्व २०११ नंतर हळूहळू कमी-कमी होत आहे. त्यातच २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक तेंदूपत्ता कंत्राटदारास नक्षलवाद्यांना शस्त्रसाहित्य पुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेंदूपत्ता व्यवसायातून नक्षलवाद्यांना मोठी रसद मिळते, याची माहिती पोलीस विभागाकडेही आहे. त्यामुळे या व्यवसायावर पोलिसांची कडक नजर राहत असते. या पार्श्वभूमीवर कंत्राटदारावर कारवाई झाल्याने आता दुर्गम व अतिदुर्गम भागातील तेंदू युनिट खरेदी करण्यास कंत्राटदार धजावत नाही. एकूण परिस्थितीमुळे तेंदूपत्ता व्यवसायावरचे बिडी व्यापाऱ्यांचे वर्चस्व कमी-कमी होत चालले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)