गडचिरोलीत सभा : मागण्या मान्य न झाल्याने संतप्तगडचिरोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गडचिरोलीचे कर्मचारी १ आॅगस्टपासून राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहे. गडचिरोली येथे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी नुकतीच कर्मचाऱ्यांची जाहीर सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या सभेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.या सभेला राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. बावणे, सल्लागार एच. ए. पठाण, राज्य सरकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, उपाध्यक्ष लतीफ पठाण आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्याध्यक्ष पाचरणे यांनी सन २०१२ व २०१३ मध्ये संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली होती. दोनही वेळेस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तत्त्वत: मान्यता देऊन लवकर शासन निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. १६ आॅगस्ट २०१३ रोजी बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आले होते. २६ मागण्या प्रलंबित आहे. त्या पारीत न झाल्याने आंदोलन करावे लागत आहे, अशी माहिती उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांना दिली. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. १ जुलै रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. ९ जुलैला जिल्हाधिकऱ्यांना निवेदन देण्यात आले. १४ जुलैला लेखनी बंद करण्यात आली व आता १ आॅगस्टला बेमुदत आंदोलन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Updated: July 28, 2014 23:33 IST
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गडचिरोलीचे कर्मचारी १ आॅगस्टपासून राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहे. गडचिरोली येथे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी
महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}