शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख १३ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:28 IST

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत

७४ केंद्रांवर धानाची आवक : मंजुरी मिळूनही १३ केंदे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत; दुर्गम गावांतील शेतकऱ्यांची अडचण गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आतापर्यंत ३१ कोटी ४१ लाख १८ हजार ९१९ रूपये किंमतीच्या २ लाख १३ हजार ६८६ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात ७४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली असून मंजुरी मिळूनही सहकारी संस्थांचे १३ केंद्र सुरू करण्यात आले नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ५८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ५१ केंद्र सुरू झाले असून या केंद्रावर धानाची आवक सुरू झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या हंगामात एकूण ३१ केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी २५ केंद्र सुरू झाले असून २३ केंद्रांवर धानाची आवक सुरू आहे. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालये मिळून एकूण ८९ केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून सुरू झालेल्या ७६ केंद्रांपैकी ७४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली आहे. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत असलेल्या सहकारी संस्थांच्या ५१ धान खरेदी केंद्रांवरून २४ कोटी ५ लाख ९१ हजार ७२४ रूपये किंमतीच्या १ लाख ६३ हजार ६६७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सहकारी संस्थांच्या २३ केंद्रांवरून आतापर्यंत ७ कोटी ३५ लाख २७ हजार १९५ रूपये किंमतीच्या ५० हजार १८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालय मिळून एकूण ७४ केंद्रांवरून जिल्ह्यात ३१ कोटी ४१ लाख १८ हजार ९१९ रूपये किंमतीच्या २ लाख १३ हजार ६८६ क्विंटल धानाची खरेदी आतापर्यंत झाली आहे. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पलसगड, गोठणगाव, देऊळगाव, वडेगाव, गेवर्धा, सोनसरी, घाटी, कढोली, आंधळी व कुरखेडा तर कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मसेली, कोरची बेतकाठी, बोरी, मर्केकसा, बेडगाव, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा व खोब्रामेंढा या १० केंद्रांना मंजुरी देण्यात आली. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पिंपळगाव, मौशीखांब व चांदाळा आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मोहली, धानोरा, सावरगाव, सुरसुंडी, रांगी, सुळे, चातगाव, मुरूमगाव, दुधमाळा, कारवाफा, गट्टा, पेंढरी आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मक्केपल्ली, रेगडी, घोट, आमगाव, मार्र्कंडा (क.), अड्याळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. दुर्गम भागात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तालुकास्तरावर धान विक्री करावी लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)