घोट तालुक्याची निर्मिती करा

By Admin | Updated: August 25, 2016 01:13 IST2016-08-25T01:13:34+5:302016-08-25T01:13:34+5:30

चामोर्शी तालुका विस्ताराने मोठा असल्याने घोट परिसरातील नागरिकांना चामोर्शी मुख्यालयाचे अंतर दूर पडते.

Produce Ghat taluka | घोट तालुक्याची निर्मिती करा

घोट तालुक्याची निर्मिती करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : घोट येथील नागरिकांची मागणी
घोट : चामोर्शी तालुका विस्ताराने मोठा असल्याने घोट परिसरातील नागरिकांना चामोर्शी मुख्यालयाचे अंतर दूर पडते. एका दिवशी तालुक्यात काम न झाल्यास वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागतात. आर्थिकदृष्ट्या हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी घोट येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
घोट हे परिसरातील मोठे गाव आहे. जवळपास २५ च्या आसपास या परिसरात गावे आहेत. येथे महत्त्वपूर्ण कार्यालये आहेत. मोठा परिसर असल्याने तालुक्याच्या दृष्टीने घोट योग्य ठिकाण आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना घोट तालुका निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, माजी उपसरपंच भारती उपाध्ये, माजी व्यवस्थापक बबन धोडरे, हेमंत उपाध्ये व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Produce Ghat taluka