शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: October 6, 2015 02:03 IST

कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटना गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शनिवारी निवेदन देऊन नगर

गडचिरोली : कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटना गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शनिवारी निवेदन देऊन नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली आहे. नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेस द्यावे, १२ वर्ष झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचारी व शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत वाढीव अर्हतेची नोंद करावी, बिंदू नामावली अद्यावत करावी, आरटीईनुसार जागा तत्काळ भराव्या, बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, प्रभाकर साखरे, कास्ट्राईब महासंघाचे सरचिटणीस गंगाधर मडावी, रवींद्र उईके, रवींद्र पटले, उपाध्यक्ष प्रमोद भानारकर, विरेंद्र सोनवाने, राजेंद्र पेंदाम, कांतीलाल, प्रशांत आकनुरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)