शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय साॅ मिल हस्तांतरणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

प्रशांत ठेपाले लाेकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : वन विभागाची शान म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील साॅ मिल वन ...

प्रशांत ठेपाले

लाेकमत न्यूज नेटवर्क

आलापल्ली : वन विभागाची शान म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील साॅ मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून ही साॅ मिल ताेट्याचा सामना करीत आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने खरेदी केल्यानंतर या मिलचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आलापल्ली भागातील सागवानाचा उच्च दर्जा लक्षात घेऊन सागाची कटाई करण्यासाठी जवळपास १२० वर्षांपूर्वी इंग्रजांनी आलापल्ली येथे साॅ मिल सुरू केली. राज्यात शासनाच्या मालकीच्या केवळ तीन साॅ मिल आहेत. त्यामध्ये डहाणू, पांढरकवडा व आलापल्ली येथील साॅ मिलचा समावेश आहे. साॅ मिलमधील कर्मचारी वेळेवर हजर न राहणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार न पाडणे, लाकूड कापण्यासाठी आलेल्या ग्राहकाला उद्धट वागणूक देणे, तसेच हवी तशी सफाईदार लाकूड कटिंग करून न देणे, यामुळे बहुतांश नागरिक व ठेकेदारांनी आलापल्ली येथील साॅ मिलमधून लाकूड कटाई बंद केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून लाकूड कटाई करून आणतात.

सागवान लाकडाच्या खांबांवर टिनाचे पत्रे टाकून साॅ मिल तयार करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही मिल ताेट्यात आहे. आणखी ताेटा सहन करणे वन विभागाला व शासनालाही परवडणारे नाही. त्यामुळे ही मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन यांनी काही दिवसांपूर्वी साॅ मिलला भेट देऊन पाहणी केली. हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याने मागील आठ दिवसांपासून येथील कामकाज पूर्ण ठप्प पडले आहे. विशेष म्हणजे, वनविकास महामंडळ हा सुद्धा शासनाच्या विभागापैकी एक विभाग आहे. जे काम वनविभागाला जमले नाही, ते काम वनविकास महामंडळ करून साॅ मिलला नफ्यात आणणार काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या साॅ मिलमध्ये चाैकीदार, कटर, सायर असे जवळपास १५ कर्मचारी आहेत. त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाणार आहे.