शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे, आरोग्य विभागानेही तसे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली. 

ठळक मुद्देविऱोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना; गडचिरोलीत घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे, आरोग्य विभागानेही तसे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली. 
देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्ह्यात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि. प. सीईओ कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती जाणून घेतली. अधिकाधिक लोकांना लस कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता  असल्याचे ते म्हणाले. त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस