शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जाेडजंतर करून सुरू आहे जिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

लाेकमत प्रतिनिधीने साेमवारी (दि.११) विद्युत कारागिरासह जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्युत फिटिंगवर नजर मारली. त्यात अनेक ठिकाणी विद्युत फिटिंगमधील ...

लाेकमत प्रतिनिधीने साेमवारी (दि.११) विद्युत कारागिरासह जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्युत फिटिंगवर नजर मारली. त्यात अनेक ठिकाणी विद्युत फिटिंगमधील त्रुटी नजरेस पडल्या. जिल्हा रुग्णालयाला माेठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासत असल्याने, या रुग्णालयासाठी स्वतंत्र डीपी बसविण्यात आली आहे. डीपीवरून रुग्णालयाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. वाॅर्डांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी एमसीबी बसविण्यात आल्या आहेत. मात्र, यातील बहुतांश एमसीबी बाॅक्स उघडेच आहेत. एका एमसीबी बाॅक्समध्ये ५० पेक्षा अधिक स्वीच आहेत. त्यांना शेकडाे वायर जाेडण्यात आले आहेत. या एमसीबी बाॅक्सला झाकण नसल्याने सर्व वायर उघड्या पडल्याचे दिसून येते.

एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात वीज केबल टाकण्यात आले आहेत. काही केबल प्लास्टिक पाईपमध्ये सुरक्षित आहेत. काही ठिकाणी विस्तारित वीज पुरवठा करण्यासाठी टाकलेले केबल मात्र पाईपशिवाय आहेत. अनेक वर्षांपासून विद्युत दुरुस्ती झाली नसल्याने पाईपसह काही केबल लाेंबकळत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी एका केबलला दुसरा केबल जाेडण्यात आला आहे. वायर जाेडतेवेळी चिकटपट्टी निघून गेली आहे. त्यामुळे धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच दुरुस्ती हाेणे आवश्यक आहे.

बाॅक्स ..

‘सीएस’च्या केबीनसमोरच वायरचे जाळे

जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी बसत असलेल्या खाेल्यांच्या समाेरच एमसीबी बाॅक्स बसविण्यात आला आहे. हा एमसीबी बाॅक्स पूर्णपणे उघडा आहे. त्यामुळे एमसीबी बाॅक्समधील वायर लाेंबकळत असल्याचे दिसून येते. रुग्णालयातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कक्षांसमाेरच ही स्थिती असेल तर जिल्हा रुग्णालयातील इतर वाॅर्डांमधील विद्युत फिटिंगचा अंदाज येण्यास मदत हाेते.

बाॅक्स ....

अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक ऑडिट नाही

फायर ऑडिटप्रमाणेच दर दाेन वर्षांनी इलेक्ट्रिक ऑडिट हाेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालयातील विद्युत फिटिंगची सध्याची स्थिती लक्षात घेतली तर मागील अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक ऑडिट झाले नसल्याचे दिसून येत आहे. इलेक्ट्रिक ऑडिट झाले किंवा नाही, याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

बाॅक्स .....

मुख्य दरवाजाला लागूनच अनेक वायर

मुख्य दरवाजातून आंतररुग्ण विभागात जाताना असलेल्या मुख्य दरवाजाला लागूनच अनेक वायर आहेत. हे वायर अगदी उघडे आहेत. यातील एखाद्या वायरचे वरचे आवरण निघून दरवाजाच्या लाेखंडी राॅडला स्पर्श झाल्यास विद्युत प्रवाहित हाेऊन जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स ...

बांधकामे झाली, मात्र विद्युत फिटिंगकडे दुर्लक्ष

मागील दाेन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात काेट्यवधी रुपयांचे बांधकाम केले जात आहे. अनेक वाॅर्डांची दुरुस्ती करण्यात आली आहे. काही वाॅर्ड खासगी रुग्णालयांप्रमाणे चकाचक झाले आहेत. तसेच नवीन इमारत झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीवरील भार कमी झाला आहे. मात्र जुन्या इमारतीमधील विद्युत फिटिंगच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.