शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम वीज कर्मचाºयांनी केले.

ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : भामरागड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीज तारा तुटल्या. परिणामी शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न करून २४ तासात भामरागड शहराचा वीज पुरवठा सुरळीत केला.वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम वीज कर्मचाºयांनी केले. भामरागड येथील विश्वेश्वरराव चौक व मुस्लिम टोला भागात वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र अंधार पडल्याने इतर भागातील वीज दुरूस्तीचे काम बंद करावे लागले.पोलीस स्टेशन चौक, आंबेडकरनगर, वीर बाबुराव चौक व शोभानगर आदी भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. सोमवारी पोलीस व वीज कर्मचाºयांच्या परिश्रमाने या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आले. पोलीस स्टेशनसमोरील मोठे झाडे वीज तारांवर पडल्याने वीज खंडित झाली. सोमवारी सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. रखरखत्या उन्हात गरम वीज खांबावर चढण्यासाठी वीज कर्मचाºयांना कसरत करावी लागली. भामरागड येथील अभियंत्याकडे अल्प मनुष्यबळ आहे. त्यामुळे दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागतो. रविवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या जोरदार वादळी पावसाने भामरागडवासीयांना हादरवून सोडले. वादळामुळे नागरिकांमध्ये तारांबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक संदीप भांड, हवालदार खोब्रागडे यांच्यासह लाईनमन नदीम शेख, राजू महका, शशिकांत ढोले यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :electricityवीज