शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

राकाँही न.प.च्या सत्तेत

By admin | Updated: January 3, 2015 23:01 IST

२०११ च्या डिसेंबरमध्ये गडचिरोली नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या युवाशक्ती आघाडीने यावेळी सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला सत्तेत सहभाग

गडचिरोली : २०११ च्या डिसेंबरमध्ये गडचिरोली नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या युवाशक्ती आघाडीने यावेळी सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला सत्तेत सहभाग दिल्याचे आजच्या निवडणुकीतील समिकरणावरून दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल गण्यारपवार गटाचे गोकुलनगर वार्डातील नगरसेवक विजय गोरडवार यांना नियोजन आणि विकास या समितीचे सभापती पद देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. त्या बळावर सत्ताधाऱ्यांनी हे सभापती पद गोरडवारांना दिले. सार्वजनिक बांधकाम विषय समितीच्या सभापती पदी पुन्हा आनंद श्रृंगारपवार यांना संधी देण्यात आली. शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती पदावर सचिन काशिनाथ बोबाटे हे कायम राहिले आहे. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी डॉ. अश्वीनी सुधिर धात्रक, पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदी संजय गोपाळराव मेश्राम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी शारदा दामले या जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. गेल्यावेळी नियोजन व विकास समितीचे सभापती पद भाजपच्या बेबीताई चिचघरे यांच्याकडे होते. त्यांच्याऐवजी आता राकाँच्या गण्यारपवार गटाचे विजय गोरडवार यांना संधी देण्यात आली आहे. भाजपला डच्चू या निवडणुकीत मिळालेला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे आज बैठक पार पडली. २३ व २ स्विकृत नगरसेवक असे २५ सदस्य असलेल्या पालिकेत बैठकीसाठी केवळ २१ नगरसेवक हजर होते. बैठकीला काँग्रेसच्या पुष्पा कुमरे, सत्ताधारी युवाशक्ती आघाडीच्या चेतना ठाकरे, अपक्ष माधुरी खोब्रागडे व राकाँचे ज्येष्ठ नगर सेवक सुरेश पोरेड्डीवार हे गैरहजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे, के. एन. येरगुडे, बी. एम. शेंडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांशी फारकत घेतल्याने गण्यारपवार गटाच्या गोरडवारांना यावेळी संधी मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)