शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धानोरातील वीज आठ तास गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

ठळक मुद्देउकाड्याने नागरिक त्रस्त : महावितरणचा नियोजनशून्य कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गेल्या सात-आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. अशा स्थितीत नागरिक कुलर व पंख्याशिवाय स्लॅबच्या घरात राहू शकत नाही. मात्र नेमक्या अशाच वेळी २७ मे रोजी बुधवारला धानोरा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा तब्बल ८ तास खंडित होता. परिणामी उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु येथील वीज कर्मचाऱ्यांनी एक तास उशिरा म्हणजे सकाळी ९ वाजतापासून झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामास सुरूवात केली. हे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होते. परिणामी शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होता. काम आटोपल्यावर ५ वाजून १० मिनीटांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. नागरिकांनी तब्बल ८ तास ४५ अंश सेल्सिअस तापमानात कुलर व पंख्याविना घालविले. परिणामी वृद्ध नागरिक व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सध्या उष्णतामान वाढल्याने नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिलीच नाहीयापूर्वी कोणत्याही ठिकाणची वीज दुरूस्तीची कामे किंवा झाडाच्या फांद्या तोडण्यासाठीच्या कामादरम्यान किती तास व कोणत्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे, याबाबतची पूर्वसूचना प्रसार माध्यमातून दिली जात होती. मात्र महावितरणच्या वतीने अशी कुठलीही पूर्वसूचना धानोरा तालुक्यातील नागरिकांना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देण्यात आली नाही. त्यामुळे धानोरावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. डिस्चार्ज झाल्याने अनेकांचे मोबाईलसुद्धा बंद पडले होते.

टॅग्स :electricityवीज