शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

By admin | Updated: March 5, 2016 01:23 IST

जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यात याव्या, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १ मार्च रोजी मुंबई येथे भेट घेऊन ....

मुंबईत भेट : ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची माहितीगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यात याव्या, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १ मार्च रोजी मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत ओबीसींच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील जनतेचे स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी व ती जाहीर करावी, राज्यपालांची अधिसूचना रद्द करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, पाचवीपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात २३ डिसेंबर २०१५ पासून उपोषणाला सुरुवात केली होती. सतत ६० दिवस आंदोलन करण्यात आले. १ मार्च रोजी ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी व ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक लांजेवार यांनी आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. आरक्षणाची समस्या सहा महिन्यात निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ६० दिवस चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सहा महिन्यांत समस्या न सुटल्यास आणखी आंदोलन करण्याचा तसेच उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला प्रवीण घाटे, रमेश भुरसे, रमेश उप्पलवार, केशव सामृतवार यांच्यासह ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.दारू व तंबाखूमुक्तीसाठी सर्चला पाच कोटींचा निधीदारू तसेच तंबाखूमुक्तीसाठी सर्च या संस्थेला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांसाठी पाच कोटी रूपये आदिवासी विकास विभागाने मंजूर केले आहेत. याबाबतचे पत्र आदिवासी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून आदिवासी उपयोजनेंतर्गत येणाऱ्या नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक उपयोजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सदर निधी कसा काय मंजूर करण्यात आला, ही बाब आपण मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सदर निधी व्यसनमुक्ती समितीसाठी देण्यात आला आहे, अशी माहिती आपणाला दिली. मात्र आदिवासी विकास विभागाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिलेले पत्र व मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य यामध्ये तफावत असल्याचा आरोप प्रा. अशोक लांजेवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे.