घर जळालेल्या कुटुंबाला पोलिसांची मदत

By Admin | Updated: April 4, 2017 00:49 IST2017-04-04T00:49:46+5:302017-04-04T00:49:46+5:30

उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दितील नैनगुड्डम येथील वसंत सोनू शेगम यांच्या राहत्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली.

Police help families who have burnt the house | घर जळालेल्या कुटुंबाला पोलिसांची मदत

घर जळालेल्या कुटुंबाला पोलिसांची मदत

दामरंचा उपपोलीस स्टेशनचा उपक्रम : वसंत शेगम यांच्या कुटुंबाला दिले जीवनोपयोगी साहित्य
जिमलगट्टा : उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दितील नैनगुड्डम येथील वसंत सोनू शेगम यांच्या राहत्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली. या आगीत शेगम यांचे घर जळून खाक झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. दामरंचा उपपोलीस स्टेशनच्या वतीने शेगम कुटुंबाला जीवनोपयोगी साहित्य देऊन मदत केली.
नैनगुडम येथील वसंत सोनू शेगम यांच्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली. या आगीत शेगम यांचे घर जळून खाक झाले. त्याचबरोबर कपडे, भांडी, अन्नधान्य जळाल्याने वसंत शेगम यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शेगम यांच्या कुटुंबात त्यांची लहान पाच मुलींचा समावेश आहे. ही बाब दामरंचा पोलीस स्टेशनला माहित झाल्यानंतर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक विलास मोरे, पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे, अभिजीत भोसले, नागनाथ पाटील, गणेश मोरे व उपपोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा केली. यातून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी कपडे, संसार उपयोगी भांडे, किराणा सामान खरेदी करून दिले. पोलिसांच्या या कार्याचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे. पोलिसांची मदत बघून शेगम कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकायला सुरूवात झाली. या उपक्रमातून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात उतरले.

Web Title: Police help families who have burnt the house