शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

नांगरणी करायची? मग माेजा प्रतितास ९०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मान्सूनपूर्ण  पावसामुळे शेतजमिनीत थोडा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात यासाठी लागणारे ट्रॅक्टर भाडे प्रतितास ९०० रुपये घेतले जात असून गतवर्षीपेक्षा  १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काही ट्रॅक्टर मालक प्रतितास ९५० रुपये भाडे घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरुपात रोजगार उपलब्ध झाला आहे.धान पिकासोबतच कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करीत असतात. मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे होत असते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते;मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत चालला आहे.शेती व्यवसायाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अधिक शेती असणारे बरेच शेतकरी आपली अर्धीअधिक शेती दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर देत आहेत. १० एकरपैकी २ एकर स्वत: करायची व ८ एकर शेती ठेक्याने मशागत व पीक लागवडीसाठी द्यायची, असा प्रकार ग्रामीण भागात सुरू आहे. 

शेतजमीन स्वच्छतेवर भर -    गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सध्या प्रचंड तापमान असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर सकाळच्या सुमारास शेतावर जाऊन शेताची स्वच्छता करीत आहेत. काडीकचरा जाळणे, पाळे स्वच्छ करणे, काटेरी झुडपांची ताेड करणे आदी कामे सुरू आहेत. जून महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात हाेणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती