शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर गादी पध्दतीत पाट काढून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठिबक सिंचन व पाटाद्वारे होताहे पाणी पुरवठा : अनेक शेतकऱ्यांकडून मंडप पद्धती तर काही ठिकाणी गादी पद्धतीचा वापर

अरविंद घुटके ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : भाजीपाला पिकाचे उत्पादन म्हटले की, देसाईगंज तालुक्यातील मोहटोला किन्हाळा परिसर असे समिकरण जुळलेले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र येथे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. या भागात यंदा जवळपास दीडशे एकर जागेत कारले पिकाची लागवड करण्यात आली आहे.कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर गादी पध्दतीत पाट काढून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे. वास्तविक कारले हे वेलवर्गीय पीक आहे. या वेलींना आधार दिल्यावर त्याची चांगली वाढ होते. फळधारणेचे प्रमाण मोठे असते. कारले पिकाच्या शेतीत मंडप केल्याने फुटवे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढतात. त्यामुळे पाने व फळे यांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे ओलावा लागून ती सडण्याची भिती नसते. कीड व रोगाचे प्रमाण देखील कमी राहते. फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्याची वाढ सरळ होते. सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळाचा रंग चांगला राहतो. गादी पध्दतीत काही फुटवे आल्यानंतर दुसरे फुटवे मर्यादीत स्वरूपात येतात. या वेली एकमेकात गुंतल्यामुळे सारख्या प्रमाणात प्रत्येक वेलीस सूर्यप्रकाश मिळत नाही.कारले लागवडीची पध्दत कोणतीही असली तरी या भागातील शेतकरी भरघोस उत्पादनाची आस लावून आहेत. जेव्हा कारल्याचे पीक निघण्यास सुरूवात होते, तेव्हा देसाईगंजच नव्हे तर नागपूर शहरातील अनेक व्यापारी कारले खरेदीसाठी मोहटोला व किन्हाळात दाखल होत असतात. किन्हाळा-अरततोंडी रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धा एकर शेतात शेतकरी उमेश पत्रे यांनी कारले पिकाची लागवड केली आहे.

दोन लाख रुपयाचे मिळते उत्पन्नकारले पिकाच्या लागवडीसाठी कृषी सहायकापासून तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असून उत्पादन खर्च वजा जाता अंदाजे दोन लाख रुपयाचे उत्पन्न अर्धा एकरातील कारले पिकातून मिळणार आहे, अशी अपेक्षा शेतकरी उमेश पत्रे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :vegetableभाज्या