शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुलाजवळील खड्डा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. छत्तीसगडमधील आऊंदी येथे आठवडी बाजार भरते.

ठळक मुद्देछत्तीसगडकडे जाणारा चव्हेला मार्ग : पावसाळ्यात वाहून गेली मार्गावरील माती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा-चव्हेला मार्गावर असलेल्या नाल्याच्या पुलावरील अर्धा रस्ता खचला आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकाचे लक्ष नसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. छत्तीसगडमधील आऊंदी येथे आठवडी बाजार भरते. या बाजाराला जाण्याकरिता अनेक मालवाहू वाहने याच मार्गाने जातात. पेंढरी येथे जाण्याकरिताही हा मार्ग जवळ पडतो. मुंगनेर, येनगाव, बोदीन, चव्हेला, रानवाही येथील अनेक शालेय विद्यार्थी धानोरा येथे शिक्षणासाठी येतात. तसेच नागरिक शासकीय कामासाठी येतात.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चव्हेला गावाजवळ असलेल्या नाल्यावरील रस्ता खचून गेला आहे. पाणी वाहण्यासाठी टाकलेले सिमेंटचे पाईप दिसत आहेत. जवळपास पाच फूट खोलीचा खड्डा पडला आहे. वर्दळीमुळे पुन्हा रस्ता खचत चालला आहे.रस्ता अतिशय चांगला असल्याने या ठिकाणावरून वाहन अतिशय वेगाने जाते. मध्येच खड्डा पडत असल्याने या खड्ड्यात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्याची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा