शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 5, 2017 01:28 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली.

सामान गुंडाळण्याचे काम सुरू : मार्र्कंडा यात्रेत झाली लाखोंची उलाढाल मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली. आता सात दिवसानंतर येथील व्यावसायिक व यात्रेकरूंनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान यात्रेतील दुकानदारांनी आपले सामान जमा करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. काही दुकानदारांचे जत्थे परतीच्या मार्गावर लागले आहे. मार्र्कंडादेव येथील यात्रेमध्ये गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांसह मुंबई, तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. व्यवसाय करण्यासाठी अनेक दुकानदारांनी येथे दुकान लावले होते. काही जणांनी मनोरंजनात्मक खेळही सुरू केले होते. पाच ते सहा दिवस या यात्रेत प्रचंड भाविक होते. मात्र सातव्या दिवसांपासून भाविकांची संख्या प्रचंड कमी झाल्याने व्यवसायावरही परिणाम होऊ लागला. यात्रा संपण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून येथील व्यावसायिकांनी आपले दुकान गुंडाळण्याचे काम सुरू आहे. तसेच आकाशपाळणे, मौत का कुआ, सर्कस आदी ठिकाणचे साहित्य जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही आपले हॉटेल गुंडाळण्याचे काम हाती घेतले आहे. प्रशासनाने मार्र्कंडादेव येथे यात्रेदरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे भरारी पथकाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यावर्षीच्या यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. याचे कारण आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेले नियोजन होय. यात्रेपूर्वीच सदर विभागाने बोट व इतर सुविधा येथे केल्या होत्या. (वार्ताहर)