शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाबाधितांचा उच्चांक, मृत्यूचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST

जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार १९ झाली आहे. तर ११ हजार २४९ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ...

जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार १९ झाली आहे. तर ११ हजार २४९ जणांनी काेराेनावर मात केली आहे. २ हजार ५८५ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ११ नवीन मृत्यूंमध्ये गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा येथील ६४ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील कारागोटा ५६ वर्षीय महिला, आरमोरी येथील ६७ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, धानोरातील ५२ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ७२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ५० व ७५ वर्षीय दाेन पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, गडचिराेली शहरातील गोकूलनगर येथील ५६ वर्षीय महिला, भंडारा तालुक्यातील कुडेगाव येथील ८७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नवीन ४३४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६५, अहेरी ६८, आरमोरी ३३, भामरागड १४, चामोर्शी २०, धानोरा २१, एटापल्ली १७, कोरची १२, कुरखेडा १७, मुलचेरा ४, सिरोंचा ९ व देसाईगंज तालुक्यातील ४२ जणांचा समावेश आहे.

बाॅक्स

लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास गुन्हा नाेंदविणार

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधू, त्यांचे आई-वडील, मंगल-कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हे नाेंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. तसेच गर्दीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

एप्रिलमधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कार्यक्रमातील गर्दी कमी करण्याबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बाॅक्स

जिल्ह्यात जमावबंदी आदेश

गडचिरोली : राज्यात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहेत. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.

विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहित

जिलह्यात करोना विषाणूचे संशयबाधित रुग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यासाठी तसेच संशयबाधित लोकांचे विलगीकरण करण्यासाठी राखीव विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यात शासकीय मुलींची आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.