शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन कोटी परत जाणार

By admin | Updated: July 16, 2015 01:57 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०११-१२ या वर्षात जिल्ह्यात अंगणवाडी इमारतीची ४३५ कामे मंजूर करण्यात आली.

अखर्चित निधी : अंगणवाडी इमारत बांधकाम; चार वर्षे उलटूनही ११४ इमारती अपूर्णच
लोकमत विशेष
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०११-१२ या वर्षात जिल्ह्यात अंगणवाडी इमारतीची ४३५ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ११४ कामे अपूर्ण आहेत. या कामावरील अखर्चित पावणे दोन कोटी रूपयांचा निधी शासनाला परत जाणार असल्याची विश्वसनिय माहिती जि.प. च्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुक्यात एकूण १७७१ अंगणवाड्यात आहेत. यापैकी बहुतांश अंगणवाड्यांच्या इमारतीची दूरवस्था आहे. तर अनेक अंगणवाड्या समाजभवन तसेच जिल्हा परिषद शाळांच्या जुन्या इमारती भरविल्या जातात. अंगणवाडी इमारतीचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने २०११-१२ मध्ये इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार नाबार्ड व जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत ४३५ अंगणवाडी इमारतीच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच नाबार्ड व डीपीडीसीकडून जि.प.ला १९ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. मिळालेल्या निधीतून जि.प. च्या बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३२१ कामे पूर्ण करण्यात आली. मंजूर ४३५ कामांची किमत प्रत्यक्षात १७ कोटी ४० लाख रूपये होती. त्यामुळे उर्वरित २ कोटी १६ लाख रूपये जि.प. प्रशासनाने यापूर्वीच शासनाला परत केले आहे. त्यानंतर अपूर्ण कामांमुळे पावणे दोन कोटींचा निधी शिल्लक राहिला. सदर निधी जमा करण्याची कारवाई प्रशासकीय स्तरावर सुरू असून या महिन्याच्या अखेरीस सदर निधी शासनाला परत केला जाणार आहे.
नव्याने मंजुरी घ्यावी लागणार
जिल्ह्यातील बाराही तालुक्यात एकूण ४३५ अंगणवाडी इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. यापैकी ३२१ कामे पूर्ण झाले असून ११४ कामे अपूर्ण आहेत. विहित वेळेत सदर कामे पूर्ण न झाल्याने शिल्लक निधी शासनाला परत पाठविण्याचे निर्देश वरिष्ठस्तरावरून जि.प. प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे आता अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळवावी लागणार आहे.