शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या ‘जैसे थे’ राहणार

By admin | Updated: July 25, 2015 01:59 IST

कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती.

शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीचे विद्यार्थी
वैरागड : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती. या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पटसंख्या ‘जैसे थे’ च ठेवून आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
सन २०१३- १४ या शैक्षणिक वर्षात शासनाने माध्यमिक शाळांना संलग्न असलेल्या आदिवासी विभागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ५०, ग्रामीण भागासाठी ५५ व शहरी भागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ६० ठरविण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात मात्र या तिनही विभागातील पटसंख्येची अट वाढवून ८० एवढी करण्यात आली. वरीष्ठ महाविद्यालयाला संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीची संख्या ८० वरून १२० करण्यात आली. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आले होते.
या विरोधात २२ जुलै रोजी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चे काढण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, २८ जुलै रोजी शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्यात येईल. उर्वरित मागण्यांवरसुद्धा सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)