सिरोंचातील रूग्ण हैदराबादमध्ये पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:33+5:30

कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला रूग्ण हृदयरोगाने आजारी होता. तो काही दिवस उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी दवाखाण्यात गेला होता. मात्र त्रास कमी न झाल्याने ई-पास काढून तो हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल झाला. त्याच ठिकाणी त्याला ताप आल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल ३१ मे रोजी पॉझिटीव्ह आला.

Patients in Sironcha tested positive in Hyderabad | सिरोंचातील रूग्ण हैदराबादमध्ये पॉझिटीव्ह

सिरोंचातील रूग्ण हैदराबादमध्ये पॉझिटीव्ह

Next
ठळक मुद्देवाहन चालक व मालकाचा अनेकांशी संपर्क : सिरोंचातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून केला घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : ३१ मे रोजी सिरोंचा तालुक्यातील एका रूग्णाचा कोरोना अहवाल तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पॉझिटीव्ह आल्याने सिरोंचा शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. प्रशासनाने रूग्ण राहत असलेला ग्लासफोर्टपेठा हे गाव तसेच सिरोंचा काही भाग शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला रूग्ण हृदयरोगाने आजारी होता. तो काही दिवस उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी दवाखाण्यात गेला होता. मात्र त्रास कमी न झाल्याने ई-पास काढून तो हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल झाला. त्याच ठिकाणी त्याला ताप आल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल ३१ मे रोजी पॉझिटीव्ह आला. अहवाल पॉझिटीव्ह येताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ग्लासफोर्टपेठा हे गाव सील केले आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात बाहेरच्या नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन नगर पंचायतीमार्फत ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केले जात होते. त्याचा प्रवासाचा इतिहास तपासला जात आहे. ज्या वाहनाने तो हैदराबाद येथे गेला, त्याचा वाहन चालक सिरोंचा बसस्थानक परिसरातील असल्याने सदर वार्ड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लंबडपल्ली, बामणी, गर्कापेठा, सिरोंचा या गवांशी संपर्क आल्याने सदर परिसर सुध्दा सील करण्यात आला आहे. रूग्णाच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत, पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

रूग्ण, वाहन चालक व मालक कुठे फिरले याचा शोध घेताना कसरत
आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्वच रूग्ण क्वॉरंटाईन केलेले होते. ते जिल्ह्यातील नागरिकांच्या संपर्कात आले नसल्याने त्यांच्यापासून इतरांना धोका नव्हता. मात्र ग्लासफोर्टपेठा येथील रूग्ण गावात होता. त्याची प्रकृती बिघडल्याने गुरूवारी त्याला सायंकाळी हैदराबाद येथे पोहोचविण्यात आले. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबिय होते. रूग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले असता, शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सदर रूग्णाला खासगी रूग्णालयातून हैदराबाद येथील कोविड रूग्णालयात हलविले आहे.

ज्या वाहनाने रूग्णाला हैदराबाद येथे पोहोचवून दिले, तो वाहन चालक सिरोंचा येथील आहे. रूग्णाला हैदराबाद येथील खासगी रूग्णालयात पोहोचविल्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन सिरोंचात परत आला. वाहन मालकानेही सदर वाहन काही जागी फिरविले आहे. तसेच वाहन चालक व मालकाचा इतरही नागरिकांशी संपर्क आला आहे. हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदर रूग्ण नेमका कोणाच्या संपर्कात आल्याने पॉझिटीव्ह आढळला हे शोधणे सुध्दा आव्हानात्मक ठरणार आहे.

एटापल्लीत येणाऱ्या वाहनांची तपासणी
एटापल्ली तालुक्यात सुमारे १० कोरोना रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे सर्व नागरिक क्वॉरंटाईन होते. इतर नागरिकांपासून एटापल्ली तालुक्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बाहेरून एटापल्ली तालुक्यात प्रवेश करणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर महसूल विभागाचे पथक नेमले आहे.

Web Title: Patients in Sironcha tested positive in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.