शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध लाकडांवर पासिंग हातोडा

By admin | Updated: October 14, 2014 23:18 IST

येथून जवळच असलेल्या पाथरगोटा आणि अंतरजी येथील शेतकऱ्यांच्या साग व बिजा या मौल्यवान प्रजातीच्या झाडांची कंत्राटदारामार्फत जून महिन्यामध्ये तोड करण्यात आली. एका ठिकाणी

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा आणि अंतरजी येथील शेतकऱ्यांच्या साग व बिजा या मौल्यवान प्रजातीच्या झाडांची कंत्राटदारामार्फत जून महिन्यामध्ये तोड करण्यात आली. एका ठिकाणी जमा केलेल्या या झाड्यांच्या २० ते २५ घनमीटर लाकडांच्या मालावर ११ आॅक्टोबरच्या रात्री सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास पासिंग हातोडा हॅम्बर वन विभागाच्या माध्यमातून मारण्यात आला. सदर वृक्षतोड अवैध असतानाही या संदर्भात चौकशी करण्यात आली नाही. वन संवर्धन काळाची गरज आहे. वन कायदा हा एका बाजूने अवैध वृक्षतोडीला जबाबदार आहे. मात्र वनकायदा बाजूला सारून स्वार्थापोटी वनाधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने पाथरगोटा व अंतरजी परिसरातील शेतकऱ्यांच्या झाडांची तोड केली जात आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित ही बाब उजेडात आणली होती. मुख्य वनसंरक्षक गडचिरोली व उपवनसंरक्षक वडसा यांनी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची कसल्याही प्रकारची शहानिशा केली नाही. यावरून वनाधिकाऱ्यांचे अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील झाड तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. शिवाय या परवानगीकरिता अनेक कागदपत्रांची जुळवाजुळवही करावी लागते. मात्र कंत्रादाराने कोणतेही पुरावे जोडले नसतांनाही हजारो घनमीटरची लाकडे तोडून अवैध वाहतूक करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आहे. पाथरगोटा व अंतरजी येथील अवैध वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)