शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटिनम ज्युबिली शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:58 IST

गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अनावश्यक शुल्क वाढ केल्याचा आरोप करीत काही संतप्त पालकांनी शनिवारी शाळेसमोर हंगामा केला.

ठळक मुद्देअनावश्यक शुल्कवाढ केल्याचा आरोप : सामूहिक टीसी काढण्याचा इशारा; शाळेत पार पडली सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अनावश्यक शुल्क वाढ केल्याचा आरोप करीत काही संतप्त पालकांनी शनिवारी शाळेसमोर हंगामा केला.पालकांनी १५ मार्च रोजी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या संचालक मंडळाला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे व्यवस्थापन शहरातील इतर शाळांच्या तुलनेत अवाढव्य शुल्क आकारत आहेत. टर्म फीज, लायब्ररी फीज, मटेरियल फीज, कल्चरल फीज, स्पोर्ट फीज, लेबॉरटरी फीज, अ‍ॅन्युअल मेंटनन्स फीज, अ‍ॅडमिशन फीज आदी प्रकारचे अवाजवी फीज घेऊन पालकांवर आर्थिक भूर्दंड लादला जात आहे. एवढे शुल्क जास्त होत असल्याने शाळा संचालक मंडळाने शुल्क कमी करावे, अशी मागणी निवेदनातून केली. निवेदनाची दखल घेत शाळेने पालकांची शनिवारी दुपारी ४ वाजता सभा आयोजित केली. या सभेत शुल्क कमी करण्याची मागणी पालकांनी केली. मात्र १० टक्के शुल्क वाढ केल्याशिवाय शाळा चालविणे शक्य नसल्याचे सांगून १० टक्के शुल्क वाढ केलीच जाईल, अशी माहिती प्राचार्य रहिम अमलानी यांनी सभेदरम्यान पालकांना दिली. त्यामुळे पालक आणखी संतप्त झाले. शाळेतून बाहेर निघतेवेळी काही संतप्त पालकांनी शाळेवर दगडफेक सुध्दा केली. शिक्षण शुल्कात कपात न केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची टीसी काढली जाईल, असा इशारा दिला.शिक्षण विभागाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेत पालक शिक्षक समिती स्थापन करणे आवश्यक असतानाही या शाळेत पालक शिक्षक समितीच गठीत करण्यात आली नाही. पालकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्राचार्यांनी पालक शिक्षक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले. गणवेश, पुस्तके सुध्दा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप केला आहे.शाळेतर्फे कोणतेही अनावश्यक शुल्क आकारले जात नाही. संस्थेला शासनाकडून अनुदान मिळत नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नियमानुसार शुल्क वाढ केली जात आहे. नियमानुसार करण्यात येत असलेल्या शुल्कवाढीला पालकांचा विरोध असून काही काही संस्था पालकांना भडकावत आहेत. केवळ शाळेला बदनाम करण्याचा हा षडयंत्र रचला जात आहे.- रहिम अमलानी, प्राचार्य,प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोली