एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. ग ...
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन ...
तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडण ...
यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर ...
नगर परिषदेने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी स्वच्छता व फवारणीवर भर दिला आहे. यासाठी ३६ लाख रूपयांची तरतुद केली आहे. १४ व्या वित्त आयोगाचा ३ कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. त्यापैकी ३६ लाख रूपयांमधून सॅनिटायझर, मनुष्यबळ व फवारण्यांसाठी आव ...
सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतु, यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हाच आहे. ...
सालमारा या पेसा गावातील अशिक्षित, गरीब, गरजू नऊ बचत गटातील विविध जाती, धर्मातील महिलांना तीन लाख रूपये तीन वर्षाकरिता देण्यात आले. यातून महिलांनी मधनिर्मिती केंद्राची स्थापना केली. याकरिता २० पेट्या खरेदी केल्या. मधमाशांचे पोळे आणून त्याचे संगोपन करण ...
अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडता येते, असे असतानाही चामोर्शी शहरातील व परिसरातील काही युवक व नागरिक अनावश्यक कामासाठी दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येते. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेकदा युवकांना दंडुकेशाहीचा व ...
पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून कोरची तालुक्यातील नवेझरी येथील माजी सरपंचाची नक्षलवाद्यांनी २९ मार्च रोजी रात्री हत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. ...
सदर कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोंढाळा ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. यासाठी ग्राम पंचायत स्तरावर कोरोना दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या प ...