२५० वाहनांवर दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:48+5:30

अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडता येते, असे असतानाही चामोर्शी शहरातील व परिसरातील काही युवक व नागरिक अनावश्यक कामासाठी दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येते. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेकदा युवकांना दंडुकेशाहीचा वापर केला. मात्र याला नागरिक मानण्यास फारसे तयार नाही. त्यामुळे चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी संचारबंदी तोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

Penalty action on 250 vehicles | २५० वाहनांवर दंडाची कारवाई

२५० वाहनांवर दंडाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देघराबाहेर पडण्यास मज्जाव : चामोर्शी पोलिसांनी वसूल केला ६२ हजाराहून अधिक दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या २५० वाहनधारकांवर चामोर्शी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ६२ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे संचारबंदीचे उल्लंघन करणारे नागरिक धास्तावले आहेत.
नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला विनाकारण घराबाहेर पडण्याची मुभा नाही. अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना बाहेर पडता येते, असे असतानाही चामोर्शी शहरातील व परिसरातील काही युवक व नागरिक अनावश्यक कामासाठी दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येते. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेकदा युवकांना दंडुकेशाहीचा वापर केला. मात्र याला नागरिक मानण्यास फारसे तयार नाही. त्यामुळे चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी संचारबंदी तोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
चामोर्शी-आष्टी मार्ग, बसस्थानक परिसर व इतर प्रमुख मार्गावर पाळत ठेवून वाहतूक पोलिसांनी २५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस व ठाण्यातील कर्मचारी सुरक्षा, व्यवस्था सांभाळण्याचे काम करीत आहेत.


२०० वर नागरिकांना दिली मदत
चामोर्शी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २०० पेक्षा अधिक गरीब, गरजू नागरिकांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तांदूळ, डाळ, तिखट, मीठ, हळद, तेल पॉकेट आदी वस्तूचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. गरजू व्यक्तींनी पोलीस ठाण्यात येऊन साहित्य घेऊन जावे, असे आवाहन ध्वनि क्षेपकाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यातर्फे येत आहे. याशिवाय मास्क, हॅन्डवॉश, परराज्यातून येणाºया ट्रक चालकांना केळीचे वाटप करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेल्यांनी घराबाहेर पडू नये, तसे झाल्यास गुन्हे दाखल करू, संचारबंदीबाबत नागरिकांनी जागृत राहावे, असे आवाहन ठाणेदार बोरकर यांनी केले.

Web Title: Penalty action on 250 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.