Former sarpanch killed in Gadchiroli by Naxals | गडचिरोलीत माजी सरपंचांची नक्षल्यांकडून हत्या

गडचिरोलीत माजी सरपंचांची नक्षल्यांकडून हत्या

ठळक मुद्देकोरची तालुक्यातील घटना पोलीस खबऱ्याचा संशय


लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून कोरची तालुक्यातील नवेझरी येथील माजी सरपंचाची नक्षलवाद्यांनी २९ मार्च रोजी रात्री हत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.
हिरालाल रामसाय कल्लो (४०) असे मृत इसमाचे नाव आहे. हिरालाल हे पोलिसांना नक्षलवाद्यांची गोपनीय माहिती देत असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. नक्षलवादी रविवारी रात्री नवेझरी गावात पोहोचले. त्यांनी हिरालाल यांना त्यांच्या गावाबाहेर नेले आणि त्यांची हत्या केली. सकाळी हिरालालचा मृतदेह गावाजवळच्या रस्त्यावर आढळून आला. मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी पत्रके टाकली आहेत. त्यात हिरालाल हा पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Former sarpanch killed in Gadchiroli by Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.