नाल्यानजीकच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:47+5:30

सदर कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोंढाळा ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. यासाठी ग्राम पंचायत स्तरावर कोरोना दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात सरपंचासह कोंढाळाचे उपसरपंच कैैलास राणे पोलीस पाटील किरण कुंभलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार, स्वयंसेवक नितेश पाटील आदींचा समावेश आहे.

liquor production destroyed | नाल्यानजीकच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

नाल्यानजीकच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देसाहित्य ग्रा.पं.मध्ये जमा : कोरोना जनजागृती पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूड : देसाईगंज तालुक्याच्या कुरूड परिसरात कोंढाळापासून दोन किमी अंतरावरील नाल्याच्या परिसरात लावलेल्या हातभट्ट्या रविवारी स्थानिक कोरोना जनजागृती पथकाने उद्ध्वस्त केल्या. येथील टाकाऊ माल नष्ट करून ड्रम व इतर साहित्य ग्राम पंचायत कार्यालयात जमा करण्यात आले.
सदर कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोंढाळा ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. यासाठी ग्राम पंचायत स्तरावर कोरोना दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात सरपंचासह कोंढाळाचे उपसरपंच कैैलास राणे पोलीस पाटील किरण कुंभलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार, स्वयंसेवक नितेश पाटील आदींचा समावेश आहे.
कोंढाळा गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या परिसरात मोहफूल दारूची हातभट्टी चालविली जाते. येथे मोहफुलाची दारू गाळून इतरत्र पुरवठा केला जातो, अशी माहिती मिळाली. काही मद्यपी लोक सदर हातभट्टीच्या ठिकाणी जाऊन दारू पितात. परिणामी येथे जमाव निर्माण होऊन धोका होऊ शकतो, असा अंदाज आल्याने पथकाने जनजागृतीच्या उद्देशाने नाल्याच्या परिसरात पाहणी केली. यावेळी येथे कुणीही नव्हते. मात्र दारू बनविण्याचे साहित्य व सडवा होता. इसम पसार झाल्याचा अंदाज आहे.

दक्षता बाळगण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाहेर किराणा दुकानात गर्दी करू नये. किराणा दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर पाणी, सॅनिटायझर व हॅन्डवॉशची व्यवस्था करावी. खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास संबंधितावर १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. ताप, सर्दी, खोकला व गळ्यामध्ये खवखव असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे. गावात फिरताना मास्क किंवा हातरूमालचा वापर करावा, अशा सूचना कोंढाळा ग्राम पंचायतीने केल्या आहेत.

Web Title: liquor production destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.