शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेत जमिनीची नियमबाह्य मोजणी

By admin | Updated: March 19, 2015 01:31 IST

तालुक्यातील मौजा पालोरा येथील तलाठी सज्जा क्रमांक ६ मधील सर्वे नं. १४८ च्या शेत जमिनीची सीमा कायम करण्यासाठी भूमी अभिलेख ..

आरमोरी : तालुक्यातील मौजा पालोरा येथील तलाठी सज्जा क्रमांक ६ मधील सर्वे नं. १४८ च्या शेत जमिनीची सीमा कायम करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी लगतच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस व पूर्व सूचना न देता जमिनीची मोजणी केली. अर्जदार शेतकऱ्याच्या बतावणीवरून त्याच्या वहिवाटीत नसलेली दुसऱ्या सर्वे नंबरची शेतीची जागा दाखवून कर्मचाऱ्यांनी मोजणीदरम्यान पाण्यासकट मामा तलावाची पाळ सरकवली, असा आरोप करीत लगतच्या शेतकऱ्यांनी पुनर्मोजणी करण्याची मागणी केली आहे.सर्वे नं. १४८ ला लागून सर्वे नं. १४१ ही सरकारी गटाची जमीन आहे. या गटाची जमीन सर्वे नं. १४८ चे मालक धनराज बन्सोड यांना देण्यासाठी भूकरमापकाने सर्वे नं. १४४ च्या तलावाची पाळ ५० मीटर पुढे सरकवली, असा आरोप लगतचे शेतकरी तानाजी चिलबुले, नत्थू जिपकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीला चिलबुले यांनी केला आहे.सर्वे नं. १४१ मध्ये शेतकऱ्यांना वाटपाच्या जागा मिळाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या सर्वे नंबरमधील जागेची २००४ व २०११ मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली होती. त्यावेळी यांची वहिवाट १४१ मध्ये असल्याचे निदर्शनास आले. या मोजणीदरम्यान धनराज बन्सोड हे स्वत: हजर होते, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. धनराज बन्सोड व शेषराव बन्सोड यांनी सर्वे नं. १४८ व १४९ हे दोन जमिनीचे गट खरेदी केले होते. २००१ च्या मोजणीत सर्वे नं. १४१ मधील शेतकऱ्यांची वहीवाट सर्वे नं. १४८ मध्ये नव्हती. सन २००१, २००४ व २०११ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीत तलावाची पाळ कायम त्याच जागेवर दाखविण्यात आली होती. २० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरण व पाळीवर बांधकाम झालेले नाही. मात्र २३ फेब्रुवारी २०१५ च्या मोजणीदरम्यान भूकरमापक जाधव यांनी अर्जदाराच्या संगनमताने पाळीची जागा पुढे सरकवली. २३ फेब्रुवारीच्या जमीन मोजणीत आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोपही तानाजी चिलबुले, प्रल्हाद मेश्राम, नत्थू चिबकाटे, शीला चिलबुले यांनी करीत सदर मोजणी रद्द करून पुनर्मोजणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)