ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:45+5:302021-02-06T05:09:45+5:30

गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला काँग्रेस अनुसूचित ...

Organizations support OBC March | ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा

ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा

गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला काँग्रेस अनुसूचित जाती सेलचा पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी दिली आहे. मोर्चा शांतता व सुव्यवस्थित पार पाडण्याकरिता ओबीसी बांधवांना सहकार्य करणार असल्याचेही रजनीकांत मोटघरे यांनी म्हटले आहे.

ओबीसी महामोर्चाला हसनअली गिलानी यांचा पाठिंबा

गडचिरोली : ओबीस समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ फेब्रुवारीला जिल्हा कचेरीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, तसेच प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणीही हसनअली गिलानी यांनी केली आहे.

Web Title: Organizations support OBC March