महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:14+5:30

गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. या सभेत ऑनलाईन पध्दतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया राबविण्याबाबत मंथन करण्यात आले.

Online study-teaching to college students | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन

Next
ठळक मुद्देप्राचार्यांच्या बैठकीत मंथन । तांत्रिक सुविधा कराव्या लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ हे पदवी व पद्व्युत्तर विभागाचे शैक्षणिक सत्र लांबणीवर पडले आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रथम सत्रातील अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. तशी चर्चा विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन स्वरूपात घेतलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. या सभेत ऑनलाईन पध्दतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया राबविण्याबाबत मंथन करण्यात आले.
तंत्रज्ञान प्लॅटफार्मची निर्मिती, शैक्षणिक साहित्य, अभ्यासक्रमाचे मॅपिंग करणे, विद्यार्थ्यांना क्रेडीटसाठी लॅब तयार करून देणे, चर्चा करून आराखडा तयार करणे आदी बाबींवरही चर्चा झाली. सदर ऑनलाईन सभेत कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व विद्या शाखेचे अधिष्ठाते आणि परीक्षा संचालकांनी सहभाग घेतला होता.

२० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन
कोरोना महामारीमुळे महाविद्यालय तसेच विद्यापीठाचे विविध शैक्षणिक विभाग सुरू होण्यास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. कोरोनाचे संकट न हटल्यास हा कालावधी पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया, अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया राबविण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे. प्राचार्यांसमवेत झालेल्या ऑनलाईन सभेत यावर चर्चा झाली. आॅनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया राबवून किमान २० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयातील वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दती राबविण्यासाठी महाविद्यालयांना व्हॉटस्अ‍ॅप व मेलच्या माध्यमातून तांत्रिक सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे. विविध प्रकारचे अ‍ॅप्स तयार करून विद्यार्थ्यांना लिंक द्यावी लागणार आहे. स्वयंपोर्टलसारखे तंत्रज्ञानही वापरावे लागणार आहे.

नेटवर्क अभावी उडणार फज्जा
एटापल्ली, अहेरी, सिरोंचा तालुक्यात केवळ बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवा आहे. मात्र बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसून कनेक्टिव्हीटीची अडचण आहे. ऑनलाईन कामे करताना महाविद्यालय प्रशासनाला प्रचंड अडचणी येत आहेत. कव्हरेज नसल्यामुळे एटापल्ली तालुक्यात ऑनलाईन अध्ययन, अध्यापन प्रक्रिया घेणे शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन.बुटे यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नाहीत. सर्व विद्यार्थी स्वगावी परतले आहेत. अहेरी उपविभागातील सर्वच पाच तालुक्यात कव्हरेज व कनेक्टिव्हीटीची मोठी समस्या असल्याने या भागात आॅनलाईन शिक्षण पध्दती यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Online study-teaching to college students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.