शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

कृषी योजनांसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्जाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल यांनी ही वेबसाईट तयार केली आहे.

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण उपक्रम : लॉकडाऊनमुळे अडणार नाही शेतकऱ्यांचे काम; लिंकवर भरता येणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली कार्यालयामार्फत स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर स्मार्ट फोनमधून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमींवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल यांनी ही वेबसाईट तयार केली आहे.या वेबसाईटवर गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या चार तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकची माहिती कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. सदर लिंक संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. कृषी विभागाच्या या नवीन उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्याचे पूर्ण नाव, गाव, तालुका, मोबाईल क्रमांक, लिंग, प्रवर्ग, शेतीचे क्षेत्र तसेच कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या योजनेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सदर अर्ज सबमिट करायचा आहे.या योजनांचा घेता येईल लाभसदर ऑनलाईन अर्ज २० एप्रिलपर्यंत करायचे आहेत. त्यात बाबासाहेब फुंडकर फळबाग योजना, मनरेगा फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, तुषार सिंचन योजना, ठिबक सिंचन योजना, कीटकनाशकांसाठी अनुदान, औषधी वनस्पती लागवड, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यासदौरा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना