शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षशिस्तीला डावलून जिल्हाध्यक्षाची एकतर्फी कारवाई

By admin | Updated: July 8, 2015 01:56 IST

भाजपाचे चामोर्शी पंचायत समिती उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांच्या विरोधात मतदान केल्याचा ठपका

वरिष्ठांकडे दाद मागणार : मनमोहन बंडावारसह पाच पं.स. सदस्यांची माहिती
गडचिरोली : भाजपाचे चामोर्शी पंचायत समिती उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांच्या विरोधात मतदान केल्याचा ठपका ठेवून भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी आम्हा पाच पंचायत समिती सदस्यांवर पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई केली. मात्र सदर कारवाई करताना नागदेवे यांनी चामोर्शीचे भाजपा तालुकाध्यक्ष यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही. तसेच जिल्हा कार्यकारिणीचा ठरावही घेतला नाही. भाजपाच्या कोर कमिटीचा निर्णय घेतला नाही. जिल्हाध्यक्ष नागदेवे यांनी पक्षशिस्तीला पायदळी तुडवून आमच्यावर एकतर्फी कारवाई केली, असा आरोप करीत या संदर्भात आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती चामोर्शीचे पं.स. सदस्य मनमोहन बंडावार, भाजपाचे पं.स. गटनेते रेवनाथ कुसराम यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना मनमोहन बंडावार यांनी सांगितले की, भाजपाच्या क्रियाशील सदस्यास पक्षातून निष्कासीत करण्यासाठी एक विशिष्ट पध्दत आहे. निष्कासीत करणाऱ्यांच्या विरोधात तसा ठराव पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत पारित झाला पाहिजे. सदर ठराव पक्षाच्या कोर कमिटीकडे पाठवावा लागतो. त्यानंतर कोर कमिटीने घेतलेला निर्णय प्रादेशिक स्तरावरील शिस्तपालन समितीकडे पाठवावा लागतो. प्रादेशिक स्तरावरून झालेल्या निर्णयानुसार पक्षातून निष्कासीत करण्याची कारवाई जिल्हाध्यक्षांना करता येते. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागदेवे यांनी अशी कुठलीही प्रक्रिया पार न पाडता स्वत:च्या मनमर्जीने भाजपच्या पाच पं.स. सदस्यांना पक्षातून निष्कासीत करण्याची कारवाई केली. आम्हा पाचही जणाला जिल्हाध्यक्ष नागदेवे यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याबाबतची कोणतीही नोटीस व पूर्वसूचना दिली नाही. उलट आमचे पाचही जणांचे पं.स. सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली असल्याची माहिती बंडावार यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष नागदेवे हे जिल्ह्याच्या पक्षीय राजकारणात गटबाजी करीत असून व्यावसायिक राजकारणाला खत पाणी घालत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेला धोका निर्माण होत आहे. नागदेवे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासाठी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचेही बंडावार यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला चामोर्शीचे पं.स. सदस्य रंजना कुमरे, मनिषा दुधबावरे, मिनाक्षी देवगडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
दुधबळेंना अभय, आमच्यावर मात्र कारवाई
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात तसेच जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे जि.प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे व संध्या दुधबळे, केशव भांडेकर यांनी पक्षाच्या विरोधात खुलेआम काम केले. पक्षाचे आदेश मानले नाही. परंतु पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याविरोधात आजतागायत पक्षविरोधी कारवाई संदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही. कारवाई केली नाही. भारतीय जनता पक्षात जिल्हाध्यक्ष नागदेवे हे पक्षपातीपणाची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप माजी पं.स. उपसभापती मनमोहन बंडावार व पं.स. गटनेते रेवनाथ कुसराम यांनी पत्रकार परिषदेत केला.