शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिसांच्या मदतीने वृद्ध दाम्पत्याला मिळाला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

सिंधूताई आकुलवार या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वृध्द दाम्पत्य ५० वर्षांपासून मार्र्कंडा कं. येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचे स्वत:चे घर पावसामुळे कोसळले. त्यानंतर त्यांनी लहानशी झोपडी तयार केली. यात दिवसभर ते राहायचे व रात्र मंदिरात काढायचे. तीन वर्ष हा दिनक्रम चालला.

ठळक मुद्देसंडे अँकर । २८ दिवसात बांधून दिले नवीन घर; तीन वर्ष रात्र काढल्या मंदिराच्या आवारात

सुधीर फरकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडा क. येथील मुरलीधर आकुलवार व त्यांच्या पत्नी सिंधू आकुलवार या वृध्द दाम्पत्याचे घर तीन वर्षापूर्वी पावसाने कोसळले. त्यामुळे हे दाम्पत्य झोपडी बांधून त्यात दिवसभर राहत होते. दरम्यान ८ आॅगस्ट २०१९ रोजी ही झोपडी पावसाने पडली. त्यानंतर पोलीस विभागाच्या पुढाकाराने या वृध्द दाम्पत्यांना नवीन घर बांधून देण्यात आले. पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुूळे या वृध्द दाम्पत्याला हक्काचा व पक्का निवारा मिळाला.सिंधूताई आकुलवार या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वृध्द दाम्पत्य ५० वर्षांपासून मार्र्कंडा कं. येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचे स्वत:चे घर पावसामुळे कोसळले. त्यानंतर त्यांनी लहानशी झोपडी तयार केली. यात दिवसभर ते राहायचे व रात्र मंदिरात काढायचे. तीन वर्ष हा दिनक्रम चालला. दरम्यान ८ आॅगस्ट २०१९ रोजी मूुसळधार पावसाने आकुलवार दाम्पत्याच्या झोपडीचे छत व भिंत पूर्णत: कोसळली. सुदैवाने यात ते बचावले. मात्र आता राहायचे कुठे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. दरम्यान पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करीत आकुलवार दाम्पत्यांना २८ दिवसात नवीन घर बांधून दिले. या उपक्रमातून पोलिसांनी माणुसकीचा परिचय दिला. आकुलवार दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या दाम्पत्याची संपूर्ण माहिती संजय पंदिलवार यांनी पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल यांना दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षकांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्ष डॉ. मोहीतकुमार गर्ग, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक मनिष कनवालिया, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याशी या संदर्भात चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर पोलीस विभागाने घराचे बांधकाम हाती घेतले. ठाणेदार निर्मल यांनी या कामाची माहिती सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.कर्मचाºयांच्या मदतीने २८ दिवसात घर बांधून तयार झाले. त्यानंतर स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य, फर्निचर व कपडे या वृध्द दाम्पत्याला देण्यात आले. हे सर्व पाहून मुरलीधर व सिंधूताई यांच्या चेहºयावर आनंदाश्रू वाहत होते. वास्तूपुजनाच्या दिवशी हा सर्व प्रसंग पाहून हे दोघेही भारावून गेले.१३ ला झाला गृहप्रवेश१३ सप्टेंबर रोजी सदर नवीन घराचे वास्तूपूजन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यानंतर हे घर आकुलवार दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. वृध्द दाम्पत्यावर आलेल्या संकटाला पोलीस विभाग धावून आला. आष्टी पोलिसांनी केलेले हे काम चांगले आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कनवालिया यांनी सांगितले.वेतनातून वर्गणी गोळाआष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातून आकुलवार यांच्या घर बांधकामासाठी काही रक्कम गोळा केली. यासाठी पोलीस विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही आर्थिक मदत घेतली. तीन ते चार लाख रुपयातून सदर वृध्द दाम्पत्यांना नवीन पक्के घर बांधून देण्यात आले. या काही नागरिक व पत्रकारांनीही मदत केली.

टॅग्स :Policeपोलिस