रस्त्यावर खांब असल्याने वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST2021-07-11T04:25:03+5:302021-07-11T04:25:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज स्थित मुख्य महामार्गावर रस्ता रुंदीकरण झाल्याने विद्युत खांब रस्त्यावर आल्याने, तेवढा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होत ...

Obstacles to traffic due to poles on the road | रस्त्यावर खांब असल्याने वाहतुकीस अडथळा

रस्त्यावर खांब असल्याने वाहतुकीस अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क

देसाईगंज स्थित मुख्य महामार्गावर रस्ता रुंदीकरण झाल्याने विद्युत खांब रस्त्यावर आल्याने, तेवढा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होत नसल्याने त्याच भागात वाहने पार्किंग करून यामुळे अतिक्रमणास वाव मिळत आहे.

देसाईगंज ही मोठी बाजारपेठ असून तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने, शहरात नित्याच्या व्यवहारासाठी वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होत असते. सद्यस्थितीत हुतात्मा स्मारक ते बांधकाम विभागाचे विश्रामगृह व देसाईगंज येथील लाखांदूर टी पाइंट ते जेजाणी राइस मिल, लाखांदूर ते ब्रह्मपुरी मार्ग या रस्त्यावरचे अनेक खांब अगदी रुंदीकरणामुळे दीड ते दोन मीटर रस्त्यावरच आहेत. त्यामुळे हा मार्ग रुंदीने मोठा असला, तरी विद्युत खांबामुळे हा रस्ता वाहनांच्या आवागमनासाठी निरुपयोगाचा ठरत आहे, तसेच विद्युत पोल रस्त्यावरच आल्याने अतिक्रमणधारकांना ही जागा वापरावयास मिळत असल्याने, बहुतेक ट्रान्सपोर्ट वाहने याच पोलच्या मधोमधील भागात पार्किंग करून ठेवली जातात. परिणामी, रस्ता हयात असूनही विद्युत खांब मधोमध आल्याने, तो रस्त्याचा भाग वापरण्यात येत नाही. त्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. हे खांब बऱ्याच वर्षांपासून जैसे थेच्याच अवस्थेत आहेत. सार्वजनिक हिताचा विचार करून विद्युत खांब ताबडतोब बाजूला करावेत व पोलमुळे अडलेली जागा वाहतुकीसाठी मोकळी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

090721\1347img_20201215_114654.jpg

रस्त्यावरच विद्युतखांब आल्याने वाहतुकीस रस्ता कमी उपलब्ध

Web Title: Obstacles to traffic due to poles on the road