शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंगचे शिक्षण पूर्ववत सुरू व्हावे!

By admin | Updated: March 1, 2017 01:36 IST

चातगाव येथील डॉ. नर्सिंग कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहावर २२ फेब्रुवारी रोजी दगडफेक करण्यात आली

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा : स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मागणी गडचिरोली : चातगाव येथील डॉ. नर्सिंग कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहावर २२ फेब्रुवारी रोजी दगडफेक करण्यात आली. यामुळे विद्यार्थिनी भितीपोटी स्वगावी परतल्या. तेव्हापासून नर्सिंग कॉलेजमधील शिक्षणाची प्रक्रिया बंद पडली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सदर कॉलेजमधील नर्सिंगचे शिक्षण पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थिनींनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष निलीमा अंबादे, सचिव श्रीदेवी बारसागडे, सहसचिव भारती सडमेक यांच्यासह नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नर्सिंगच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०१७ ही आहे. तसेच नर्सिंग अभ्यासक्रमाची परीक्षा १ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. आमचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह पूर्ववत सुरू करून आम्हा विद्यार्थिनींना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी यावेळी केली. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना प्रत्यक्ष भेटून शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा त्यांच्यापुढे मांडला. यावर विद्यार्थिनींच्या शिक्षणाची, निवासाची तसेच इतर सुविधा करून सदर महाविद्यालयाची शिक्षण प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात येईल. मात्र या कार्यवाहीला वेळ लागेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नायक यांनी आम्हा विद्यार्थिनींना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी संपर्क साधला, अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्ष अंबादे यांनी पत्र परिषदेत दिली.