शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नर्सेस करणार राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

नर्सेसचे सेवाविषयक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील नियमित एएनएम/एलएचव्ही, कंत्राटी एएनएम (एनएचएम) सहभागी होत आहेत. नर्सेसच्या विविध मागण्यांमध्ये, आरोग्यसेवक महिलांची रिक्त पदे भरणे, रिक्त पदे भरताना कंत्राटी एनएचएम आरोग्यसेवक महिलांचा प्राधान्याने विचार करावा, त्यांना रिक्त पदे भरताना अग्रक्रम द्यावा, बंधपत्रित आरोग्यसेवक महिलांची सेवा रूजू दिनांकापासून ग्राह्य धरून त्यांना सेवेत कायम करावे.

ठळक मुद्देसेवाविषयक मागण्या प्रलंबित : मुख्य कार्यकारी अधिकारी व डीएचओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासन व प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही नर्सेसच्या सेवाविषयक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत आहे. या आशयाचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना देण्यात आले.
नर्सेसचे सेवाविषयक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील नियमित एएनएम/एलएचव्ही, कंत्राटी एएनएम (एनएचएम) सहभागी होत आहेत. नर्सेसच्या विविध मागण्यांमध्ये, आरोग्यसेवक महिलांची रिक्त पदे भरणे, रिक्त पदे भरताना कंत्राटी एनएचएम आरोग्यसेवक महिलांचा प्राधान्याने विचार करावा, त्यांना रिक्त पदे भरताना अग्रक्रम द्यावा, बंधपत्रित आरोग्यसेवक महिलांची सेवा रूजू दिनांकापासून ग्राह्य धरून त्यांना सेवेत कायम करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट ठरवून देण्यात यावे, यात कोणते काम कोणी करावे याचा उल्लेख असावा. एकाच कामाकरिता सर्वांना जबाबदार धरू नये, शिफ्टनुसार कामाचे तास ठरवून द्यावे. केंद्र व उपकेंद्रात आरोग्यसेवक महिलांची अतिरिक्त पदे भरावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती, जिल्हा मुख्यालय आदी ठिकाणी आरोग्यसेवक महिला व आरोग्य सहायिकांचे पद भरावे, जिल्हा प्रशिक्षण पथकात महिला कर्मचाऱ्यांचे पद नाही. त्या ठिकाणी दोन आरोग्य सहायकाप्रमाणे सहायिकांची स्थायी पदे भरावी. पदोन्नती देताना इतर कॅडर प्रमाणे सेवेत हजर दिनांकापासून पदोन्नती द्यावी, समाजकंटकांपासून संरक्षणासाठी महिला संरक्षणाचा कडक कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश होता.
निवेदन देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव छाया मानकर, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, आशा कोकोडे, शारदा उराडे, विद्या कोल्हेकर, विमल नगराळे, पुष्पा तुरे, मीरा बडोदे हजर होत्या.

असे होणार आंदोलन
सेवाविषयक मागण्यांसाठी नर्सेसच्या वतीने १ ते ७ सप्टेंबरदम्यान रूग्णसेवा विस्कळीत न करता काळ्याफिती लावून काम करणार. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ८ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य