शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकही शाळा अनधिकृत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. माेठ्या गावापासून तर ...

जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. माेठ्या गावापासून तर शहरात इंग्रजी माध्यमांचे काॅन्व्हेंट व शाळांची संख्या माेठी आहे. मात्र या सर्व शाळा शासनाच्या परवानगीने अधिकृतरीत्या चालविल्या जात आहेत. जिल्ह्यात अनधिकृत शाळा असल्याबाबतची नाेंद जि. प.च्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडे नाही. सर्व शाळा अधिकृत व शासन मान्यतेने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

बाॅक्स ...

ऑनलाइन प्रक्रियेमुळे बाेगसपणाला आळा

पूर्वी शिक्षण विभागाच्या कामात तसेच शालेय शिक्षण विभागाचे दैनंदिन व कार्यालयीन कामकाज ऑफलाइन केले जात हाेते. शिक्षक व विद्यार्थ्यांची ऑफलाइन हजेरी, शाळांचे सर्व प्रकारचे देयके व वेतन बिल ऑफलाइनच सादर केले जात हाेते. त्यामुळे पाच ते दहा वर्षांपूर्वी काही शाळांकडून बाेगसपणा केला जात हाेता. बनावट विद्यार्थी, बनावट आधारकार्ड दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा गाेरखधंदा सुरू हाेता. मात्र सन २०१५ पासून शासनाने शालेय शिक्षण विभाग व शाळा स्तरावरील सर्व कामकाज ऑनलाइन केले आहे. त्यामुळे बाेगसपणाला आळा बसला आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनधिकृत व शासनाच्या परवानगीशिवाय शाळा चालविणे कठीण झाले आहे. गेल्या दाेन ते तीन शैक्षणिक सत्रात एकही शाळा अनधिकृत आढळून आली नसून एकाही शाळेवर कारवाई झाली नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

काेट ....

गडचिराेली जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून सर्व माध्यमांच्या एकूण ३५२ माध्यमिक आश्रमशाळा आहेत. यामध्ये आश्रमशाळांचाही आकडा समाविष्ट आहे. शासनाची परवानगी नसताना शाळा सुरू करणे म्हणजे, अनधिकृत शाळा असणे हाेय. गडचिराेली जिल्ह्यात सध्या एकही शाळा अनधिकृत नाही. तशी प्रशासकीय लेखी नाेंद नाही.

- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) जि. प. गडचिराेली

बाॅक्स ....

एकही तक्रार नाही

तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेकडून दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर शाळांची तपासणी केली जाते. विनापरवानगीने अनधिकृतपणे शाळा सुरू असल्यास त्याची नाेंद गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्यानंतर ही नाेंद जिल्हा स्तरावरील शिक्षण विभागाकडून हाेते. मात्र गेल्या दाेन वर्षांपासून अनधिकृत शाळा सुरू असल्याबाबतची काेणाचीही तक्रार नाही. शिक्षण विभागात तक्रारीची नाेंदही नाही.