शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

जिल्ह्यात इंटरनेट व वीज सेवा प्रत्येक गावात पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अंगणवाडी सुविधांवर विशेष चर्चा केली. पुढील दोन आठवड्यात सर्व विभागांची कामे समजून घेतली जातील. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे, असे मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देविभाग प्रमुखांना केल्या मार्गदर्शक सूचना : रविवारी घेतली नियोजन समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीदरम्यान विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना दीपक सिंगला म्हणाले, महसूल, जिल्हा परिषद, वन विभाग व शासनाच्या इतर सर्व विभागांनी टीम म्हणून काम केले पाहिजे. विकासात्मक कामांमध्ये महसूल विभागानेही योगदान द्यायचे आहे. जिल्ह्यात इंटरनेट व वीज सेवा प्रत्येक गावात पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अंगणवाडी सुविधांवर विशेष चर्चा केली. पुढील दोन आठवड्यात सर्व विभागांची कामे समजून घेतली जातील. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे, असे मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागांकडून जिल्हाधिकारी सिंगला यांचा सत्कार करण्यात आला.नवीन संकल्पना सूचविण्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना आवाहनगडचिरोली जिल्ह्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी विविध विभागांना नवनवीन कल्पना सादर करण्याच्या सूचना केल्या. नवीन संकल्पनांचे स्वागतच केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.गडचिरोली जिल्ह्यात खासगी दवाखाने मोठे व अत्याधुनिक नाहीत. त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. अशावेळी शासकीय दवाखाने व त्यातील सोयीसुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडी केंद्रातील बालकाला रविवारी सकाळी पल्स पोलिओ डोज पाजून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कौशीक, पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, प्रतिभा चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, माता बाल व संगोपण अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी