दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची जन्मदात्रीकडूनच हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:34 IST2021-03-07T04:34:00+5:302021-03-07T04:34:00+5:30

कृष्णा हा नेहमी बाहेरून दारू पिऊन येऊन घरातील मंडळीना त्रास देत होता. मोलमजुरीत कमावलेले पैसे तो दारूत उडवत होता. ...

Murder of a child who was harassed by drinking alcohol | दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची जन्मदात्रीकडूनच हत्या

दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची जन्मदात्रीकडूनच हत्या

कृष्णा हा नेहमी बाहेरून दारू पिऊन येऊन घरातील मंडळीना त्रास देत होता. मोलमजुरीत कमावलेले पैसे तो दारूत उडवत होता. त्यामुळे घरात नेहमीच तणावाचे वातावरण राहात होते. शुक्रवारच्या रात्रीही तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करायला लागला. त्यामुळे राग अनावर झालेल्या त्याच्या आईने (गंगोत्री मेहतर) त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. यामुळे त्याच्या डोक्यावर जबर दुखापत झाली, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सकाळी तो तसाच पडून असल्यामुळे पाहणी केली असता, तो मरण पावल्याचे दिसून आले.

या प्रकरणी गंगोत्री मेहतर मिरी या महिलेवर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिला शनिवारी अटक केली असून, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल माने करीत आहेत. मृतक कृष्णा याला पत्नी आणि दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Murder of a child who was harassed by drinking alcohol