शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेचा पाच लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: March 18, 2015 01:41 IST

शहराचा विकास करण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन नियोजन व विकास आराखडा दरवर्षी निश्चित करीत असते.

गडचिरोली : शहराचा विकास करण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन नियोजन व विकास आराखडा दरवर्षी निश्चित करीत असते. नगर परिषदेचा सन २०१५-१६ या वर्षाचा पाच लाख १९ हजार ७३० रूपयांचा शिल्लकी अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निर्मला मडके होत्या. गडचिरोली नगर परिषदेला दर व कराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असते. शासन अनुदान, अंशदान, इतर अनुदान, गुठेवारी व बांधकाम विकास निधीच्या माध्यमातून नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळत असते. सन २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नगर परिषदेला एकूण ४२ कोटी ४३ लाख १७ हजार ७३० रूपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या उत्पन्नातून आस्थापना व सर्व विकासात्मक बाबींवर ४२ कोटी ३७ लक्ष ९८ हजार रूपयाचा खर्च होणार आहे. नगर परिषदेच्या वार्षीक एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता पाच लाख १९ हजार ७३० रूपयें वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहणार असल्याचे नगर परिषदेच्या अंदाजपत्रकावरून स्पष्ट होते. कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट मिळणारस्थानिक नगर परिषद प्रशासनाने यंदा प्रथमच अंदाजपत्रकात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट खरेदी करून वाटप करण्यासाठी दोन लाख रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट मिळण्याची शक्यता आहे.दफनभूमी व स्मशानभूमीसाठी दीड कोटी दफनभूमीमध्ये पायऱ्याच्या बांधकाम करण्यासाठी ५० लाख रूपये तसेच स्मशानभूमी विकसित करण्यासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोंडवाडा व अंगणवाडीच्या विकासासाठी बारा लाख शहरात नवे कोंडवाड्याचे बांधकाम तसेच जुन्या कोंडवाड्याच्या दुरूस्तीसाठी दोन लक्ष रूपये तर शहरात अंगणवाडी केंद्र बांधण्यासाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकाश पाडण्यासाठी ५० लाखशहरातील पथदिवे दुरूस्ती व इतर वस्तू खरेदीकरिता ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून शहरात उजेड पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)