नगर परिषद कार्यालय गडचिराेली, महात्मा जोतिबा फुले जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:16+5:302021-04-14T04:33:16+5:30

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून, तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार,निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व ...

Municipal Council Office Gadchiraeli, Mahatma Jotiba Phule Jayanti | नगर परिषद कार्यालय गडचिराेली, महात्मा जोतिबा फुले जयंती

नगर परिषद कार्यालय गडचिराेली, महात्मा जोतिबा फुले जयंती

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून, तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार,निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येतर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आहेत, असे नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओव्होळ, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, शिक्षण विभागप्रमुख बंडू टाकसांडे, अनिल गोवर्धन, राजेश मधुमटके, गणेश नाईक तसेच नगर परिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Municipal Council Office Gadchiraeli, Mahatma Jotiba Phule Jayanti